मन कातरवेडे
का भरून येती डोळे, का मन होई कातरवेडे?
का ऐकून मधुर तराणे, मन होई सुंदर गाणे?
का आभाळ येता भरुनी, मन नाचे मोर होउनी?
का पाउस जुना आठवुनी, मन बरसे अश्रु होउनी?
का ऐकून हळवे सुर, मन होई भाव विभोर?
का ऐकून बालगीतास, मनास फुटती पंख?
का मन हसते-रडते?
का मृदगंधित अत्तर होते?
का चंचल वारे पीते?
का भिउनी लपून बसते?
का वेडे हळवे होते?
का भूल-भुलैया होते?
का मनात असते प्रीती, खोल तळाशी दडूनी?
का असती इन्द्रधनुषी, मनाच्या आतून भिंती?
1 comment:
Fantastic......U want me to give music to this......
Post a Comment