October 20, 2009

कुब्जा

This is for the first time I am putting my poem on my blog... this poem is about one of Kansa's (Lord Krishna's Mama) servant/dasee, 'Kubja'. She was very ugly looking and physically deformed in shape ( the hunchback woman ). Recently read a marathi novel 'अजून नाही जागे गोकुळ' about her written by famous marathi author 'गो. नी. दांडेकर'. Can't put everything on this blog, however I could feel the pain Kubja went through... She suffered a lot. Her mother was killed by Kansa in front of her eyes and still she didn't have any choice but serve the cruel Kans.

She awaits the arrival of Lord Krishna, who will end this nightmare. She urges Lord Krishna to come for the rescue.. I have tried to put her pain in words here... I wonder if our mother earth is crying the same...

वाट पाहते आहे कृष्णा, मधुर तुझ्या मुरलीची,
पायांमधले त्राणच सरले, दमले की रे मुरारी...

साहवेना, पाहवेना, ऐकवेना यातना,
डोळ्यांमधले अश्रु सुकले तरी ना संपती वेदना.
ऐकू का रे येत नाही हाक मम अंतरीची,
वाट पाहते आहे कृष्णा, मधुर तुझ्या मुरलीची

देह दिधला तो ही असला, रूप तेही नासले,
माझिया मनीचे दु:ख ह्या कपीतच राहीले.
सर्व देहाचेच व्हावे कान इच्छा अखेरची
वाट पाहते आहे कृष्णा, मधुर तुझ्या मुरलीची

सावळ्या,
मेघांना रंग दिला,
मोरपिशी पंख दिला,
गोकुळास सखा दिला,
मधुर असा डन्ख दिला...

ह्या पापी कुब्जेस क्षणभर सूर ऐकू दे,
प्राण सरण्यापुर्वी तुझिया पाव्यातील अमृत दे...
वाट पाहते आहे कृष्णा, मधुर तुझ्या मुरलीची,
पायांमधले त्राणच सरले, दमले की रे मुरारी...

No comments: